अॅडम ग्रँट हे वॉर्टन स्कूलमधील सर्वांत कमी वयाचे प्राध्यापक आहेत. गूगल, मर्क, पिक्सार, फेसबुक, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकन सेना व नौसेना अशा अनेकांना त्यांनी सल्ला दिला आहे. सर्वाधिक लोकप्रिय प्राध्यापकांपैकी एक या पुरस्काराने बिझनेस वीक तर्फे ते सन्मानित झाले आहेत. चाळीस वर्षांखालील जगातील सर्वश्रेष्ठ बिझनेस प्रोफेसर्समध्ये ग्रँट यांचा समावेश होतो. ग्रँट यांनी मिशिगन युनिव्हर्सिटीतून ‘ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी’ या विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. ते एक ख्यातकीर्त जाहिरात संचालक, ज्युनिअर ऑलिंपिकमधील ‘स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग’ या क्रीडा प्रकारातील खेळाडू आणि एक व्यावसायिक जादूगारदेखील आहेत.