Akshar Masik October 2015 / Nachiket Prakashan: अक्षर ई मासिक ऑक्टोबर
Oct 2015 · Nachiket Prakashan
3.8star
18 reviewsreport
Ebook
25
Pages
reportRatings and reviews aren’t verified Learn More
About this ebook
पुस्तक प्रकाशन क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या नागपूरच्या नचिकेत प्रकाशनातर्फे जुलै पासून अक्षर ई-मासिकाचे प्रकाशन प्रारंभ केले आहे. जगभरातील मराठीतील प्रस्थापित आणि नवीन लेखकांसाठी हे हक्काचे मराठी साहित्याचे ई-व्यासपीठ राहणार आहे, नचिकेत प्रकाशनातर्फे 500 ई-बुक निर्मितीचा टप्पा गाठल्यानंतर हा ई-मासिकाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. *विज्ञान कथा *रहस्य कथा *युद्ध कथा *ऐतिहासिक कथा *गूढ कथा *सत्य कथा *ललित कथा *लघु कथा *कादंबरी *प्रवास वर्णन *धार्मिक/आध्यात्मिक साहित्य *अनुवाद साहित्य * वैचारिक /साहित्यिक/सांस्कृतिक/राजकीय लिखाण इ. साहित्याला अक्षरमध्ये स्थान मिळेल सर्व प्रकारच्या साहित्याचा समावेश असणारे हे ई-मासिक विविध साईटवर/प्लॅटफॉर्मवर विक्री/वितरणासाठी उपलब्ध राहणार आहे. लेख/कथा स्वरूपात लिहिणार्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. पाहिजे तो अंक विकत घेऊन आपल्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर किंवा टॅब/मोबाईलवर वाचण्याचा आनंद आता कोणालाही घेता येईल. नवीन पिढी ही टॅब/लॅपटॉपवर मराठी वाचणारी आहे. त्यांच्यापर्यंत मराठी साहित्य पोहचवायचे असेल तर ई-मासिकाशिवाय पर्याय नाही, "मागील 100 वर्षांत जे काम विविध मराठी मासिकांनी केले तेच काम आता यापुढे ई-मासिक करणार आहे, म्हणून अक्षर ई-मासिक आहे." अक्षर ई-मासिकामध्ये सर्व लोकांकडून येणार्या सर्व प्रकारच्या मराठी साहित्याचे स्वागत आहे. अक्षर चा दीपावली विशेषांकही प्रकाशित होणार आहे. तसेच वेळोवेळी विविध साहित्य प्रकारावर वाहिलेले विशेषांक पण प्रकाशित होणार आहेत. भारतभरातील तसेच जगभरातील मराठी माणसाचे, मराठी साहित्याचे ई-व्यासपीठ उभारण्याचा नचिकेत प्रकाशनाचा हा प्रयत्न आहे. सर्व प्रकारच्या मराठी साहित्यिकानी/नवोदितांनी अक्षर साठी आपले नवीन साहित्य पाठवावे आणि जगभर पोहचण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा, अंकासाठी लिखाण शक्यतो ई-मेल ने युनिकोड किंवा श्रीलिपी मध्ये पाठवावे. लिखाणमर्यादा 3 ते 5 हजार शब्द. 15 दिवस आधी लिखाण मिळावे. अंक नियमित मिळण्यासाठी आपला ई-मेल पाठवावा. ज्यांना या उपक्रमात स्वतःला जोडून घेण्याची इच्छा व तयारी आहे, त्यांचे स्वागत आहे. अक्षर मासिक संदर्भात अधिक माहितीसाठी नचिकेत प्रकाशनाच्या nachiketprakashan.com या साईटला भेट द्यावी किंवा 9225210130 वर संपर्क साधावा. मराठी साहित्याला वाहिलेला अक्षर ईमासिकाचा ऑक्टोबर अंक प्रकाशित झाला आहे. तो अंक साईटवर निःशुल्क वितरणासाठी ठेवला आहे. आपल्याला अंक ईमेलने पाठवित आहे. कृपया तो वाचून आपल्या प्रतिक्रिया/सूचना अवश्य कळवाव्या. आपल्या मित्रांनाही तो पाठवावा.
Ratings and reviews
3.8
18 reviews
5
4
3
2
1
Sumit Tehre
Flag inappropriate
June 10, 2021
excellent 👌 👍 and good book
1 person found this review helpful
Vasant Patil
Flag inappropriate
November 11, 2019
छान
1 person found this review helpful
Rate this ebook
Tell us what you think.
Reading information
Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.