अनुभव हा माझा पहिला कवितासंच आहे, यामध्ये अनेक प्रकारच्या एकूण पन्नास कविता आहेत. यामध्ये विविध परिस्थिती चे वर्णन केलेले आहे. जसे आजच्या काळात मोबाईल हा आपला कसा वेळ वाया घालवतो, आपल्याला कशा प्रकारे गुंतवून ठेवतो, आज प्रत्येक तरुण मोबाईल मध्ये पब जी, फ्री फायर या सारखे गेम खेळताना दिसतात व आपला अनमोल वेळ वाया घालवताना दिसत आहे. याचे वर्णन मी माझ्या फ्री फायर चा जमाना या कवितेमध्ये केलेले आहे. आजच्या काळात मोबाईल कसा डोकेदुखी बनलेला आहे, तसेच इंस्टाग्राम व मोबाईल चे दुष्परिणाम याबाबत मी वर्णन केलेले आहे. तसेच करोना काळानंतर झालेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची झालेल्या परिस्थिती बद्दल वर्णन मी माझ्या कवितेमध्ये केलेले आहे. आजच्या तरुणांचे बदललेले आणि विस्कळीत झालेल्या जीवनाचे वर्णन मी माझ्या कवितेमध्ये केलेले आहे. तसेच आपली माणस, मतलबी लोक, स्वार्थी, लोकांचा स्वभाव या कवितेमधुन मी आजच्या समाजातील लोकांचे वर्णन केलेले आहे . विध्यार्थी या कवितेमधुन मी स्पष्ट केलेले आहे की आजचा विध्यार्थी हा विध्यार्थी राहीलेला नाही. तो फक्त एक परीक्षार्थी झालेला आहे. तसेच भांडण, वांझोटी, विषय शेतीचा, परिस्थिती या कवितेमधुन मी आजच्या परिस्थिती चे वर्णन केलेले आहे. आई, आईंची माया या कवितेमध्ये मी आईचे वर्णन केलेले आहे. तसेच बाप, एका वडिलांचा त्याग ह्या कविता माझ्या स्वर्गवासी वडिलांना समर्पित आहे. त्या नंतर प्रेम, खोटे प्रेम, आशा, आश्वासनने या मध्ये मी आजच्या खोट्या प्रेमाचे वर्णन केलेले आहे. तसेच आजच्या राजकारणाचेही वर्णन मी माझ्या कवितेमध्ये केलेले आहे. माझा कावितासंच हा जे मी पाहिले, जे मी अनुभवले ते यामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्या मुळे मी या कवितेच्या संचाला अनुभव हे नाव दिले. असे एकूण माझा अनुभव हा कवितासंच आयुष्यभर ज्यानी आमच्यासाठी रक्ताचे पाणी केले आमचे जीवन सुखी केले असे आमच्या स्वर्गवासी वडिलांना तसेच आजच्या प्रेमाला, आजच्या तरुणांना, आजच्या राजकारणाला, आजच्या परिस्थितीला समर्पित आहे.