सौ.पुनम हेमंत भांगले-लेखिका
सेवानिवृत्त सरकारी अधिकारी,नोकरदार गृहिणी आणि 2 मुलींची आई.
यापुर्वी लेखिकेचे लेख वर्तमानपत्रातुन,मासिकातुन प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या लेखाचे अभिवाचन कोकणीतुन आकाशवाणीवर “अस्मिता” वाहिनीवरसुद्धा केलेले आहे. 2021 पासुन त्या स्वत: ब्लोगद्वारे साप्ताहीक लेखन करित आहेत.
पुस्तकाचे शिर्षकच भावनिक,वैचारिक व प्रासंगिक आहे असे कळते. तरंग हे उमटतात तसेच लोपही पावतात मात्र लेखिका हे तरंग कागदावर उमटवुन लोकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न करित आहे. त्यांचा पहिआच प्रयत्न त्यांनी खरे तर 2021 मध्येच केला होता. काही तांत्रीक कारणास्तव हे पुस्तक ई-बुक स्वरुपात वाचकांपर्यंत पोहोचू शकले नाही. 2024 मध्ये मात्र त्यांनी आधी भाग-2 प्रसिद्ध करुन मग हा पहिला भाग प्रसिद्ध करण्यास नचिकेत प्रकाशनाला अत्यंत आनंद होत आहे.
या 97 लेखांच्या पुस्तकात अनेक वेळा स्वत:चे अनुभव, पुर्वजाचे ऋण,सुख-दु:ख,समस्या,उपाय मांडण्यात आलेल्या आहेत. साध्या साध्या गोष्टि आपल्या दैंनंदिन जीवनात किती महत्वाच्या ठरतात हे पुस्तक वाचुन नक्किच कळतील. लेखिकेला पुढच्या वाटाचालीस अनेक सुभेच्छा!
सौ. पुनम हेमंत भांगले (माधवी श्रीपादराव महाजन) सौ पुनम हेमंत भांगले (माधवी श्रीपादराव महाजन) यांचा जन्मदि. 24 सप्टेंबर, 1965 रोजी बेळगाव (कर्नाटक) शहरात एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. त्यांना शाळेत असताना राष्ट्रीयस्तरावर निबंध लेखन प्रकारात अनेक बक्षिस मिळालेली आहेत. लेखिका या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. शासकीय खात्यात नौकरी करत असून त्यांना कायदेविषयक अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांची जास्त आवड आहे. गेली 10 वर्ष त्या लेखन करीत आहेत. त्यांचे लेख सत्यवार्ता, प्रत्यक्ष, रुचिपालट या वृत्तपत्रात आणि मासिकात प्रसिध्द झालेले आहेत. तसेच त्याचे बरेचशे लेख आकाशवाणीवर कोकणी भाषेतून प्रसारित झालेले आहेत. मागील वर्षापासून त्यांचे साप्ताहिक लेख फेसबूक या समाज माध्यमात प्रसिध्द होत असतात. नौकरी, घर, मुले व संसार यातून एका गृहिणीने स्व:तासाठी काढलेल्या वेळेचा सदुपयोग असे या निमित्त्याने म्हणावेसे वाटते.
रोज आजूबाजूला काहीना काही घडत असते त्याचे आपण साक्षिदार असतोच पण आपल्याही नकळत आपण कधी कधी दुसरेच संदर्भ शोधत असतो. किंवा ही गोष्ट अशी नाही तशी घडली असती तर असा विचार करत असतो. फक्त काही जण लगेच प्रतिक्रिया नोंदवितात किंवा प्रतिसाद देतात तर काही जण मनातच ठेऊन कधीतरी वेळ मिळाल्यावर कागदावर उतरवून काढतात. लेखिकेची ही अशीच काही मते, विचार, भावना तिने लेख स्वरूपात सादर केलेली आहेत. विविध विषयांवर तुलनात्मक अभ्यास करून लेखिकेने स्व:ताची मते मांडलेली आहेत. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या हे लेख म्हणजे कधी गंभीर, सामाजिक जाणिवेतून, कधी विनोदी तर कधी भावनात्मक आव्हान देणारे असून वाचकांना नक्कीच आवडतील अशी आशा आहे. यासाठी भावतरंग हे शिर्षक देऊन प्रसिध्द करीत आहे.
भावतरंगचा सलग 4 था भाग यावर्षी प्रसिद्ध करण्यांस खुप आनंद होत आहे. असाच प्रतिसाद व प्रेम मिळेल ही अपेक्षा व खात्री आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभारी आहे.