नागरी बँकांमध्ये/पतसंस्थामध्ये जी सेवक रचना आहे त्यात कनिष्ठ सेवक श्रेणी ही एक पायरी आहे. यामध्ये असा सेवक हा शिपाई, हवालदार, ड्रायव्हर, कार्यालयीन सहाय्यक अशा विविध नावाने संबोधला जातो असे सेवकही संस्थेच्या व्यवसायात, त्याच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. येणारी कोणतीही नवीन व्यक्ती प्रथम अशा सेवकाशी बोलत असते. समाजातही अशा व्यक्तीकडे लोक चौकशी करीत असतात. यासाठी त्यांना बँकिंग कामकाज याची माहिती असणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे त्यांचेकडे काय जबाबदारी आहे, त्यांनी काय केले पाहिजे याचीही कल्पना त्यांना असणे जरुरीचे आहे. याच बरोबर अशा श्रेणीतील सेवकांना वरच्या श्रेणीत जायची संधी मिळू शकते. यासाठी जशी त्यांना शैक्षणिक पात्रता लागते तशीच त्यांना बँक व बँकिंग व्यवहाराची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणेही जरुरीचे आहे. यातून ते स्वतःचा विकास करु शकतात. यादृष्टीने या पुस्तकाची रचना केली असून अशा प्रकारचे मराठीतील हे पहिले व एकमेव पुस्तक आहे.