लेखिका म्हणून 'कविता जन्मते तेंव्हा, प्रीत तुझी माझी, अव्यक्त प्रवासी,आई, हृदयातून हृदया पर्यंत, पुस्तकातली शब्द फुले' अशा बऱ्याच काव्यसंग्रहामधून भाग घेतला त्यांच्या पासून बरंच काही शिकायला मिळालं. त्या बरोबरच भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच अमरावती विभाग या ठिकाणी जिल्हा संघटक म्हणून काम करते. तिथेही बऱ्याच काव्यसंग्रहांमध्ये भाग घेतला. माझे एकूण दहा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.म् हणून स्वतः चा काव्य संग्रह असावा असं वाटलं आणि मग केलीली ही सुरुवात !! प्रत्येक स्त्री च्या मागे एक पुरुष असतोच!माझ्याही पाठीशी माझे पती आहे. त्यांच्याबरोबरच वेळोवेळी प्रोत्साहित करणाऱ्या सर्वांच्याच ऋणात राहायला मला नक्कीच आवडेल.
शुभांगी ताई म्हणतात की,
शब्दाला या ग्लानी यावी
स्फूर्तीचा इलाज दे,
शब्द पदर ओढणाऱ्या
लेखणीस लाज दे...
काव्यपंक्ती सजविण्या
शब्दरूपी साज दे,
ताऱ्यासम तेज माझ्या
लेखणीस आज दे...
आपल्या लेखणीला ताऱ्या इतके तेज मिळावे अशी आराधना करणाऱ्या शुभांगी अतकरी यांना त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी मनापासून शुभेच्छा.