हे पुस्तक म्हणजे व्यक्तिगत अनुभवांचे जसेच्या तसे प्रामाणिकपणे प्रथमपुरुषात मांडलेले अभिनव असे संकलन आहे. या सर्वच कहाण्यांमधून अशाही काही व्यक्ती आपल्यासमोर उभ्या ठाकतात, ज्यांच्या मनात भूतकाळात स्वत:च्या हातून घडून गेलेल्या चुकांची तीव्र जाणीव शिल्लक उरली आहे. जीवनातील हे काही अनुभव, कटू सत्याचे यथार्थ अंतर्बाह्य दर्शन घडवणारे आहेत. वाचकांना ह्या अशा प्रकारच्या जीवनाची, अशा अनुभवांची कधी कल्पना सुद्धा करता येणं शक्य नाही. हे अनुभव वाचकांच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून, वाचकाला अंतर्यामी हादरवून सोडतील. या अशा प्रकारच्या चुका पुन:श्च घडू नयेत म्हणून समाजातील काही घटक आज अहोरात्र कामाला लागले आहेत. अनेक सामाजिक समस्यांना हात घालणारा, असंख्य प्रश्न उपस्थित करणारा हा एक दस्तऐवज आहे.
Nothing provided