मराठी, हिंदी व गुजराती चित्रपट-मालिकांतून बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्हणून झेप घेणारे, थ्री-डी सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत ध्यास घेणारे महेश कोठारे म्हणजे, धाडसी व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. ‘बालकलाकार’ ते ‘मराठी चित्रपट दिग्दर्शक’ हा त्यांचा प्रवास म्हणजे– ‘मनोरंजन विश्वाच्या समुद्रात घेतलेली धाडसी उडी!’ आई जेनिमा व डॅडींचे आपल्या मुलाला समजून घेणे, भरभक्कम आधार बनणे, हेच महेशजींच्या आयुष्यातील पहिले यशाचे गमक. वादळात स्वत:ला झोकून देऊन ‘कलेची पूजा’ करण्याचं, अस्सल मनोरंजनाचा आनंद रसिकांना देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास व इतिहासाचे साक्षीदार म्हणून महेश कोठारे हे नाव गौरवाने घेतले जाते. सिनेसृष्टीतील जेष्ठ-दिग्गजांचा महेशजींना मिळालेला सहवास व प्रदीर्घ अनुभव नवीन ज्ञानात भर घालणाराच ठरला. कलेची साधना, मनाचे हळवेपण, घोर अडचणींवर केलेली मात, एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो, तावून-सुलाखून निघतो याची साक्ष खर्या अर्थाने ‘डॅम इट व बरेच काही’ मधून दिसते. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा हा प्रवास, झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त, दिलदार मित्र व मनस्वी लक्ष्याचं चटका लावून जाणं, सतत नवीन प्रयोग व अथक कष्ट, हिंदी-मराठी सिनेमांतील कलात्मक योगदान, जिद्द ही प्रयत्नवादाला साद घालणारी. या पुस्तकातून महेशजी आपल्याशी बोलत आहेत, चाहत्यांशी व रसिक वाचकांशी मनापासून, खिलाडूपणे संवाद साधत आहेत... असेच वाटत राहते, हेच या पुस्तकाचे मर्मस्थान व एका सच्च्या कलावंताचे जीवनगाणे...
Mahesh Kothare is an Indian actor, film director and producer of Marathi and Hindi films. He has worked in Indian cinema from a young age and acted in well-known movies such as Raja Aur Runk, Chhota Bhai, Mere Laal, and Ghar Ghar ki Kahani. The well known Hindi song Tu kitni achhi hai tu kitni bholi hai o maa from the film Raja Aur Runk features Kothare as Master Mahesh.Considered a revolutionary figure in the Marathi film industry, he began his directorial career with the groundbreaking Dhumdhadaka (1985) and has since delivered many box office hits over a period of 20 years. Kothare's films are known for their technical nuances and fantasy concepts and he is one of the few Indian film makers who have made successful films in the fantasy genre.Kothare made the first Marathi film in true 3D, Zapatlela 2, a box office hit which was released on 7 June 2013 and was the sequel to his 1993 box office blockbuster Zapatlela. In the original horror comedy a doll named Tatya Vinchu comes to life, while the sequel adds animatronics and state of the art CGI.
महेश कोठारे हे मराठी चित्रसृष्टीतील, मालिका जगतातील फार मोठं नाव. त्यांनी ‘छोटा जवान’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून ते बाल कलाकार म्हणून झळकले. त्यांनी एलएल. बी. ही पदवी मिळवली व काही वर्षं वकिलीदेखील केली. ‘प्रीत तुझी माझी’ हा नायक म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट. ‘घरचा भेदी’, ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटांमधून त्यांनी खलनायक साकारला. ‘गुपचुप गुपचुप’, ‘थोरली जाऊ’ अशा चित्रपटांमधून सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. ‘धुमधडाका’नं त्यांना पदार्पणातच यशस्वी निर्माता-दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली आणि त्यांच्या ‘झपाटलेला’ ‘दे दणादण’ इ. चित्रपटांनी ती दृढ झाली. त्यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचं श्रेय कोठार्यांनाच जातं. ‘मन उधाण वार्याचे’द्वारे त्यांचं मालिका क्षेत्रातही दमदार आगमन झालं आणि ‘जय मल्हार’ने त्यावर कळस चढवला. २००९मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt. Ltd. has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt. Ltd. to become the leaders in Marathi publishing in India today.