आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी घडत असतात परंतु त्याची कल्पना आपल्याला नसते. तशीच आहे हि कथा भुतकाळातुन चालत आलेलं एक असं युद्ध जे आपल्या जवळपास चालु तर आहे पण आपल्याला दिसत नाही किंवा त्याबद्दल काहीच माहित नाही.
आपल्या सर्वांच्या हितासाठी चालु असलेल हे युद्ध पुन्हा नव्याने सुरु झालं आहे. कथा आहे नागमणी बद्दल... नागमणी म्हणजे वर्षानुवर्षं रहस्यांने दडलेला असा एक विषय.
नागमणीच्या शोधात झालेले वाद काही नवे नाहीत पण हे वाद सुरु कधी आणि कसे झाले??
नागमणी साठी वर्षानुवर्षं युद्ध सुरूच आहेत पण जर तो नागमणी कुठला साधारण नागमणी नसुन कौस्तुभमणी असेल तर??
कसा असेल तो वाद?? कस असेल ते युद्ध?? किती वर्ष सुरु असेल ते युद्ध?? याच सर्वांची उत्तर या कथेत आहेत...