मराठी वाग्भट संहिता म्हणजेच अष्टांग हृदय संहिता. हा ग्रंथ इ.स.पूर्वी ५०० ते २५० या काळात वाग्भट यानी लिहिला. यात चिकित्सा , शल्य, शालाक्य, आदि आठ अंगांचे विवरण आहे. " हा ग्रंथ म्हणजे शरीररुपी आयुर्वेदाचे हृदय आहे." हा सर्वात लोकप्रिय ग्रंथ आहे. चरक संहिता , सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह आणि इतर जुन्या ग्रंथातील माहिती एकत्र केलेली आहे.