संबंधित विषयाचा सखोल अभ्यास, चित्रमय शैली, उत्कंठावर्धकता तसंच रंजकता ही राजेन्द्र खेर यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्यं. ‘देह झाला चंदनाचा’, ‘गीतांबरी’, ‘धनंजय’ तसंच अगस्त्य ऋषींच्या अलौकिक जीवनावर आधारित मराठी वाङ्मयविश्वातील पहिली कादंबरी ‘मांदार्य’ यांसारखी त्यांची सर्व पुस्तकं जवळपास ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत. राजेन्द्र खेर यांना आतापर्यंत ‘पुणे मराठी ग्रंथालयाचा ना. ह. आपटे पुरस्कार’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार’ असे विविध पुरस्कार लाभले आहेत.