ज्याप्रमाणे एखाद्या जलाशयात वाऱ्याच्या प्रवाहानेही तरंग उठतात.. हे तरंग चौफेर पसरत जातात. असेच अंतर्मनाच्या डोहातून हलकेच उमटणारे हे तरंग म्हणजे सदर इ-पुस्तिकेतील चारोळ्या ! आणि तो प्रवाह म्हणजे शब्दलेखणी... अशा तरांगांना योग्य दिशा देण्याचं काम सचिन कोरडे आणि शब्दलेखणी टीमकडून सातत्याने होत आहे. विविध उपक्रमांद्वारे साहित्यिक आणि सामाजिक विषयांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही नेहमीच आवडीने करत असतो. आतापर्यंत अनेक काव्यसंग्रह, चारोळीसंग्रह, लघुकथा- लेखसंग्रह, पुस्तक व इ-पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित करून आम्ही नवोदित तसेच इच्छुक लेखकांच्या स्वप्नपूर्तीसाठी थोडाफार का होईना हातभार लावला आहे याचा आम्हाला अत्यानंद आहे. लेखकांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी झटत असताना त्यांच्यां कडून लाभणाऱ्या उस्फुर्त प्रतिसाद आणि आमच्याप्रति दृढ विश्वासासाठी आम्ही नेहमीच कृतज्ञ आहोत.