गो, किस द वर्ल्ड
(जा, सारी दुनिया कवेत घे!) हा माइन्ड-ट्री या सॉफ्टवेअर कंपनीचे
सहसंस्थापक श्री. सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातु:श्रींनी
त्यांना दिलेला संदेश, हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. बुजुर्ग
व्यक्तीनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत-खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय
मोलाचं ठरतं. चला तर मग! पाहू या की, श्री. बागचींनी आपली आंतरिक शक्ती
ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची
कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला!!