Shankar Geeta: शंकर गीता (Shankar Geeta)

ShriSwamiSamartha Publication
5.0
29 reviews
Ebook
149
Pages
Ratings and reviews aren’t verified  Learn More

About this ebook

शंकरगीता हि अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री सद्गुरू शंकर महाराज ह्यांच्या लीलांची अत्यंत प्रासादिक पोथी असून ह्या विषयी लिहिण्या पेक्षा ह्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा व आपल जीवन सुखी समाधानी व समृद्ध करायला हव इतकच लिहिता येईल 

Ratings and reviews

5.0
29 reviews
Varsha Gawade
May 24, 2025
good
Did you find this helpful?
Sachin Samant
March 14, 2022
great
Did you find this helpful?
Satish Damgude
October 7, 2024
shiv शिव शिव शिव...जय शिव-शक्ति..जय शंकर महाराज..खूप छान पुस्तक वाचले मी..धन्य झालो मी शंकर महाराज यांचे वर्णन वाचून..कोटि koti नमन..जय स्वामी समर्थ...
Did you find this helpful?

About the author

ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे (सोलापूर) ह्यांना दीर्घ काळ शंकर महाराजांचा सहवास लाभला, पुढे शंकर महाराजांचे परवानगीने व भस्मे ह्यांचे मार्गदर्शन ह्याचे सहाय्याने श्री अघोर ह्यांनी ह्या प्रासादिक पोथी ची रचना केली. शंकर महाराज हे स्वामी समर्थ महाराजांशी पूर्ण एकरूप झालेले होते. त्याचं चरित्र व त्यांनी केलेलं कार्य अचंबित करणार आहे.

माझ्या सद्गुरूंचे स्मरण झाले की, माझे सर्व शरीर आनंदाने पुलकित होते. माझ्या सद्गुरूंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या सद्गुरूंचा मला दीर्घकाळ सहवास व त्यांची दीर्घकाळ सेवाही घडली. माझ्या सद्गुरुंना साकार करावे, शद्बबद्ध करावे अशी माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती. माझे स्नेही श्री. भगवंतराव अघोर यांनी महाराजांचे चरित्र लिहिण्याविषयी फार वर्षांपूर्वी मला विचारले होते. पण त्या वेळी महाराजांचा आदेश नसल्याने मी गप्प बसलो. पण महाराजांचा मला जेव्हा आदेश झाला तेव्हा श्री. अघोर यांना मी महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली. श्री. अघोर यांनी माझी विनंती मान्य करून चरित्र लिहिण्यास सुरुवात केली.


महाराजांचे चरित्र अत्यंत प्रचंड असल्याने एवढा मोठा प्रचंड ग्रंथ कोण वाचणार? ग्रंथ शक्यतो लहान व महत्त्वाच्या घटनांचा आणि कोणालाही वाचणे सुलभ होईल असा असावा असे मला वाटे. तेवढ्यात महाराजांनी श्री. अघोर यांना 'अरे, ही शंकर गीता आहे.' असा दृष्टांत देऊन ग्रंथाचे नामकरणही केले व अध्यायांची संख्याही निश्चित केली. श्री. अघोर यांनी मोठ्या कौशल्याने १८ अध्यायांत माझ्या सद्गुरुंना बहारीने नटविले, सजविले. महाराजांच्या सर्वच शिष्यांना श्री. अघोर यांनी ऋणी केले आहे. एवढे हे चरित्र उत्कृष्ट, समर्पक, सुंदर व सर्व वाङ्मयीन गुणांनी सुशोभित असून भक्तिभावांनी बहरलेले आहे याची प्रचिती ग्रंथ वाचताक्षणी येते.

याबद्दल श्री. अघोर यांना धन्यवाद !


-

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.