नैराश्य आले आहे, काही हरकत नाही.
नैराश्य हा सामान्यपणे दिसणारा परंतु एक गंभीर मानसिक आजार आहे. या आजारात मन हळूहळू कमकुवत होत जातं आणि त्याचे दुष्परिणाम जीवनात दिसू लागतात. ‘तुमचं मन कमकुवत झाल्यामुळे नैराश्याचे कारण बनत आहे’ असं तुम्हाला वाटत असेल, तर खालील प्रश्नांची उत्तरं मिळवून ते मजबूत करण्याचा प्रयत्न करा.
1. ‘मी अनेकदा निराश होतो’ असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर ‘हो’ असेल तर सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका.
2. भूतकाळाचे आणि भविष्याबद्दलचे विचार तुम्हाला दुःखी करतात का?
उत्तर ‘हो’ असेल, तर वर्तमानात जगण्याची कला शिका. यामुळे निराशेपासून मुक्त व्हाल.
3. तुम्हाला तुमच्या नैराश्याचे खरे कारण माहीत आहे का?
नसेल तर चिंतनाची सवय लावा.
4. मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यावर, त्याकडे नको तितक्या गंभीरपणे बघून सतत निराश होण्याची सवय तुम्हाला आहे का?
तशी सवय असेल, तर घटना जशा आहेत तशा पाहायला शिका.
5. यशस्वी व्यक्ती कधीही निराश होत नाहीत असं तुम्हाला वाटतं का?
असं वाटत असेल, तर ‘निराशा प्रत्यक्षात यशाला बळकटी देण्यासाठी येते’, हे जाणून घ्या.
6. समस्या आणि दुःखांमुळे तुम्ही निराश आहात का?
उत्तर ‘हो’ असेल तर ‘काही हरकत नाही’ म्हणायला शिका. समस्या येतात आणि निघून जातात.
वरील प्रश्नांची उत्तरं अधिक तपशीलवार जाणून घेण्यासाठी, हे पुस्तक वाचा आणि आयुष्य नैराश्यमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करा.