यशस्वी जीवनाची 7 पावले
मोठे ध्येय गाठणे खरंच शक्य आहे का?
आपल्याला वाटतं विचार करणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. म्हणून आपण एखादं मोठं उद्दिष्ट, मोठं ध्येय गाठण्याचा विचार करतो, तेव्हा ते केवळ एक स्वप्नरंजन ठरू शकतं. याचं कारण, विचार नेमका कसा करायचा, हेच कोणी आपल्याला शिकवलेलं नसतं.
एखाद्या समस्येवर किंवा अडचणींवर मात करण्यासाठी आपण विचार करतो, तेव्हा कधी आपल्याला वाटतं की सारे विचार संपले, आता काहीच सुचत नाही. परंतु हा शेवट नसतो तर, ते असतं मध्यंतर! दोन घटनांमधला काळ हा संधिकाळ किंवा मध्यंतर असतो. या काळात आपण थोडे थांबलो किंवा पॉज घेतला तर नक्कीच उपाय सापडू शकतो, निश्चितच मार्ग निघू शकतो, नवीन कल्पना सुचू शकते.
मात्र यासाठी विचार करण्याची कला साध्य करणे, फावल्या वेळात विचारांना योग्य दिशा देण्याचा सराव करून मननचिंतन करणंही अत्यावश्यक ठरतं. असं मननचिंतन जास्तीत जास्त प्रभावीपणे करणं हे प्रयत्नसाध्य आहे, एक शास्त्र आहे आणि कलादेखील. ही कला साध्य कशी करायची याचा मूलमंत्र आपल्याला हे पुस्तक देते.
चला तर मग, हे पुस्तक वाचून विचार करण्याची कला आत्मसात करू या, धाडस करून उत्तुंग स्वप्न बघू या… आणि ते सत्यातही आणू या…!!