
Pritam Mandhane
काव्यसंग्रहातील काही कविता हया काळजाला भिडणाऱ्या आहेत. एकूणच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लेखकाने ह्यांची मांडणी करून शब्दमाळ गुंफली आहे.मला वाटतं हा लेखकाचा पहिलाच प्रयत्न असेल.असो,काहीतरी साजूक आणि वेगळं वाचायला मिळालं याचा आनंद वाटला, मोठ्या कवितांनी मन जिंकलं आणि काही छोट्या कवितांनी मला.

Narendra Talekar
- Flag inappropriate
- Show review history
मनसंवाद नावातच अर्थ आहे कॉफी आणि चहा बरोबर असला की मग हा कवितासंग्रह वाचायला खरी मजा येते.एक नाजूक लपलेली कविता जी शेवटी आवडली " मृदुला " खूप छान वाटली. प्रस्तावना वाचून कळलं की हा कवीचा पहिलाच प्रयत्न आहे तरी काही कवितांमार्फत कवी खरच भाव खाऊन गेला. "तुला बरसताना बघून" ही कविता पण खूप भारी वाटली, ह्यातील काही कविता दहा वेळा वाचल्या आणि तितक्याच आवडल्या... बाकी काम छान आहे❤️✍🏼

Nikhil Navale
सुरुवातील हा कविता संग्रह इतर कविता संग्रहासारखा वाटला पण माझं खरं मन जिंकलं तर एका कवितेने "बाहेर पाऊस कोसळतोय" एकदम भन्नाट आहे.❤️ आपण देखील नक्की वाचावी ही कविता. वाचता वाचता देखील हुडहुडी भरते. ह्यांतील काही कवितांचा निश्चितच विषय खोल आहे असं म्हटलं तरी काही वावघं ठरणार नाही. ह्या कविता संग्रहामध्ये कवीने विविध विषयांवर भाष्य केले आहे, ते कसं ही असो मत बाकी पटलेलं आहे. स्वतंत्रपणे आणि बुलंद लेखणी चालवली आहे,✍🏼✍🏼✍🏼✍🏼📚👌