त्याच प्राकरे आदित्य आणि अश्विनी (मुख्य पात्र) यांना सुद्धा ही संधी मिळाली. कॉलेजमध्ये असताना त्यांचे होणारे संवाद, त्यांचं असलेलं नातं हे लग्ना नंतर कामाच्या नादात पूर्णपणे विस्कटून गेलं होतं. पण या कोरोनाने त्यांना ही संधी दिली, जुन्या नात्यांना नव्याने उलगडायची. पण त्यांना ही जाणीव कशी झाली? एवढी लहानशी गोष्ट समजायला त्यांना किती मानसिक आणि शारीरिक त्रास झेलावा लागला? त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरी जावं लागलं? आणि कश्याप्रकारे त्यांनी आयुष्यातले छोटे छोटे क्षण जगायचे सोडून उद्याच्या चिंतेत त्यांनी आज गमावला. अश्या परिस्थितीशी ते कसे झुंजतात आणि त्यातून कसा मार्ग काढतात याची संपूर्ण गाथा यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.