‘Letter’ was the strongest medium of communication or expression till the burst of social media. Now the story of LETTER might start with ‘Once upon a time…’
Today many of us often rely on social platforms to maintain relationships with people we care about. Getting someone's attention is as simple as clicking away at a keyboard and pressing send. Social platforms are the quick and accessible way of staying in touch, especially for people with busy schedules. Writing letters seems rather redundant in the world that we live now. Some of us may be thinking, "Why should I waste money on stamps and envelopes when I can just tag them in a photo with a heartfelt caption?"
But does it really express the emotions like the handwritten word on the paper ?
No..We don’t want to compare two mediums & get judgmental.. All we want is to relive the era of LETTERS. That’s why our theme for this year Diwali issue (Mehta Marathi Granthjagat Diwali issue 2018) is LETTER/KHAT/PAIGAM. We have inculcated the literary content based on the letters in our Diwali issue. It includes various literary forms whether it is a poem, story or an article. On the other hand we have picked up the letters from legendary personalities like Mahatma Gandhi, Amitabh Bachchan, Kishor Kumar& Smita Patil which will put focus on contemporary life style too.
सोशल मीडियाच्या काळात स्क्रोल डाऊन होणाऱ्या बोटावर संवाद संकुचित होऊ लागला . आणि संवादाचं सशक्त माध्यम असणारी पत्रं काळाच्या ओघात हरवू लागली आहेत. सरत चाललेली एक पिढी या बदलाची मूक साक्षीदार आहे. त्या पिढीत ‘आईचं पत्र हरवलं’ सारख्या खेळातही पत्रं केंद्रस्थानी होती. पत्रांनीच लेखनाची आणि वाचनाचीही गोडी रुजवण्यात हातभार लावला होता. या माध्यमानं व्यक्तिगत संवादालाही साहित्याचा आयाम दिला होता. त्यातून पत्ररुपी साहित्याची नवी परंपरा निर्माण झाली. या परंपरेची उजळणी आमच्या अंकातून करण्यात आली आहे. या अंकात कला,साहित्य,राजकारण अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या पत्रांचा आणि लेखांचा समावेश आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील, उमा कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, दादासाहेब मोरे,स्वाती चांदोरकर,यशोधरा काटकर,श्याम भूर्के अशा मान्यवरांच्या लेखांसोबत अनेक पुरातन दुर्मिळ पत्रांचं दर्शन या अंकात अनुभवायला मिळेल. ज्यात किशोर कुमार यांनी लता मंगेशकरांना लिहिलेलं हलकंफुलकं पत्र असेल , शान्ता शेळकेंनी रणजित देसाईंना लिहिलेली लडीवाळ पत्रं असतील आणि वॅन गॉगनं भावाला लिहिलेलं गहन पत्रंही असेल. हा अंक आपणास सरत्या काळातल्या एका टप्प्याशी पुन्हा जोडतो.Mahatma Gandhi, Amitabh Bachchan, Kishor Kumar, Smita Patil,Vishwas Patil, Uma Kulkarni, Ranjeet Desai, V.S.Khandekar, Shivaji Sawant, Yashodhara Katkar, Swati Chandorkar, V.P.Kale,Frida Koehlo, Dadasaheb More, Shyam Bhurke
महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, किशोर कुमार, स्मिता पाटील, विश्वास पाटील, उमा कुलकर्णी, रणजित देसाई,वि.स.खांडेकर, शिवाजी सावंत, यशोधरा काटकर, स्वाती चांदोरकर,, श्याम भूर्के, दादासाहेब मोरे