Ekoli

· · · · · ·
Latest release: August 15, 2025
Humorous · Techniques · Jokes & Riddles
Comics
7
Issues
1
Volumes

Latest releases

About this ebook series

मित्र हो,

       इंग्रजी साहित्यात One liner हा विनोदाचा प्रकार रुढ आहे. इंग्रजी Joke Books मध्ये हा प्रकार हमखास असतो. अशी बरीच पुस्तके वाचल्यानंतर मी 2008 ला  ' हसा एक ओळीत '  हे पुस्तक लिहिले.  सध्या या पुस्तकाची नववी आवृत्ती उपलब्ध आहे. हे पुस्तक म्हणजे इंग्रजी One liners चे आपली भाषा व संस्कृती सापेक्ष भाषांतरे आहेत. कमीत कमी शब्दात विनोद, उपरोध आणि दंभ स्फोट ठासून भरला आहे. मी अशा ओळींचा दीर्घकाळ संग्राहक

आहे. मी या ओळी Facebook, Whatsapp वर पोस्ट करतो आहे. सुरवातीला हे काय भलतंच ? म्हणून 

दचकणारे अनेकजण आता या ओळी मनापासून वाचतात. प्रतिसाद देतात. किंबहुना, प्रत्येक मजकुराला दुसरा वाचक भेटला की नवे विश्लेषण तयार होते. अनेक मित्रांनी या पोस्ट शेअर केल्या. काहींनी मूळ ओळींचा त्यांना भावलेला अर्थ सादर केला. मलाही या ओळींतील नवा आशय जाणवून दिला. या हसऱ्या ओळींना उत्तम प्रतिसाद मिळाला.

                मराठीत हा प्रकार रूढ करण्यासाठी आपले सहकार्य राहो ही विनंती.    

                                                                                                             

प्रा. डॉ. संजय थोरात