पुस्तकाची कथा अमेरिकी सैन्यदलात सायबर डेटा एनालिसिस असलेला जॅक, रॉ अधिकारी राजवीर, इंग्लंडमधील नोबेल पुरस्कार विजेते डॉ. रहमान, आंतरराष्ट्रीय माफिया अलेक्झांडर, त्याचा मित्र जॉन आणि इस्त्रोमधील रिसर्च विभागातील वरिष्ठ अधिकारी अभिजीत भाटकर यांच्याभोवती फिरते. या सर्वांचा एकमेकांशी संबंध कसा येतो? खरंच गुरुत्वाकर्षणाचा अंत होतो का? मनुष्याचा अहंकार आणि निसर्ग, यांच्यात नक्की कुणाचा विजय होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुस्तकामध्ये वाचावयास मिळतील. सोबतच आपल्या ज्ञानात भर याची मला पूर्ण खात्री आहे.
वाचकांसाठी विशेष सूचना: सदर पुस्तक धाडसी मोहिमेवर आधारित आहे, ज्यामध्ये अनेक देशांचा, वैज्ञानिक दाखल्यांचा संदर्भ येतो. पुस्तकात कुठेही अश्लीलता, विनोद, प्रेमप्रकरण, अंधश्रद्धा यांवर लिहिले नाहीये. विज्ञानवादी वाचक डोळ्यासमोर ठेवून पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.