बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या कायद्याची निर्मिती झाली. सुरवातीस नाही, परंतु आता अशा संस्था मोठया प्रमाणावर नोंदणी झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे याही बाबतीत महाराष्ट्र अग्रभागी राहिला आहे. सहकारी बँकापेक्षाही सहकारी पतसंस्था या बहुराज्यीय कायद्यातील तरतुदींचा अधिक फायदा घेण्याचे दृष्टीने याचा विचार करीत होत्या. यामुळे राज्य सहकारी कायद्यातून बाहेर पडून बहुराज्यीय सहकारी कायद्याखाली नोंदणी मोठया प्रमाणात झाली.