देवदत्त पट्टनाईक हे शिक्षणाने मेडिकल डॉक्टर असून व्यवसायाने नेतृत्वसल्लागार आहेत व आवडीने पुराणकथा अभ्यासक आहेत. त्यांनी पवित्र कथा, प्रतीके, विधी आणि त्यांची आधुनिक काळाशी संगती यावर भरपूर लेखनव्याख्यान केले आहे. पेंग्विन इंडियाबरोबरच्या त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत द हांडबुक ऑफ राम, मिथ=मिथ्या, अ हांडबुक ऑफ हिंदू मायथोलाजी, द प्रेग्नेनट किंग, जयः अनइलस्ट्रेटेड रीटेलिंग ऑफ महाभारत आणि मुलासाठीची देवलोक माला. देव्दतांची अपारंपरिक पद्धत आणि गुंतवून टाकणारी शैली त्यांच्या व्याख्यानामधून, पुस्तकामधून आणि लेखामधून प्रत्ययाला येते.