देवदत्त पट्टनायक हे आधुनिक काळात पौराणिक कथांच्या प्रासंगिकतेविषयी लेखन करतात आणि व्याख्यानंही देतात. 1996पासून आतापर्यंत त्यांनी 1, 000 लेखांचं आणि 50 पुस्तकांचं लेखन केलं आहे. यामध्ये माय गीता आणि बिझनेस सूत्र या पुस्तकांचा समावेश आहे. टीव्हीवर त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित होत असून, बिझनेस सूत्र आणि देवलोक विथ देवदत्त पट्टनायक या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.