सहकारी वित्तीय संस्थेचे अस्तित्व आणि संस्थेच्या यशस्विता ही संस्थेच्या ज्या मानवी घटकाच्या यशावर अवलंबून आहे तो म्हणजे ‘संचालक मंडळ’ होय. हे संचालक मंडळ विविध स्वभावाच्या, विविध बौध्दिक पातळीच्या, विविध व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचे झालेले असते. संस्था चालवणे, तिचा विकास करणे, आणि ती दीर्घकालीन अस्तित्वात राहील हे पाहणे संचालकांचे काम आहे. आपण जी संस्था काढतो ती “जिंदगी के साथ भी और बाद भी” अशी (सर्वसाधारणपणे) सर्व संचालकांची भूमिका असते/असली पाहिजे. या संचालकांच्या निवडणुकीची पध्दत कशी राहील, त्याची काय तयारी केली पाहिजे याचे संपूर्ण मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. या दृष्टीकोनातून संचालकांना त्याची भूमिका, अधिकार, जबाबदारी याची माहिती व्हावी असा या पुस्तकामागचा हेतू आहे.