महेश केळुसकर
जन्म - ११ जून १९५९, फोंडाघाट
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
M. A. (प्रथम वर्ग), मुंबई विद्यापीठ
'मालवणी मुलुखातील काही प्रयोगात्म लोककला - दशावतार, चित्रकथी, लळीत' या Ph.d.प्रबंधासमुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी अ. का, प्रियोळकर पुरस्कार
प्रथितयश मराठी नियतकालिकामधून गेल्या ३५ वर्षापासून कविता, कथा,ललित लेख व समीक्षा प्रकाशित
साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, कोकण मराठी साहित्य परिषद अशा अनेक संस्थांशी संबधित. कविसंमेलने व परिसंवादांचे आयोजन व सूत्रसंचालन.
आकाशवाणी व दूरदर्शनसाठी लेखन, निवेदन, निर्मिती. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चर्चांमध्ये सहभाग.
"नागरिक" (मराठी चित्रपट) - कथा व संवाद लेखन, पटकथा सहलेखन.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष
संपर्क -
e-mail - [email protected]
Facebook - Mahesh Keluskar