ब्रम्हदेवाच्या १० मानस पुत्रांपैकी एक, आठ चिरंजीवांपैकी एक, अनेक शास्त्र, विद्या यांचा ज्ञाता असे बहुमुखी व्यक्तिमत्व असलेला नारद एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. त्याने मात्र या साऱ्या गोष्टींपेक्षा भगवत भक्ती महत्वाची मानली व त्यातच तो कायम रममाण राहिला. अशा या महर्षी नारदांचे हे मराठीतील पहिलेच व एकमेव चरित्र आहे.