महाराष्ट्रातील प्रथित यश जिल्हा मध्यवर्ती बँका/नागरी सहकारी बँका व नामांकित पतसंस्था यांच्या कार्याचा, कामकाजाचा, व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यावर त्यांच्या विशिष्ट कामकाजाची पद्धत, नियोजन व अंमलबजावणी यांची संकल्पना गृहीत धरून पुस्तकाची निर्मिती झाली.राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांशी स्पर्धा करीत सहकारी बँकांनी/पतसंस्थांनी वर्षानुवर्षे आपले अस्तित्व स्थिर ठेवले असून जनमानसात समाजात आपत्ती प्रतिमा टिकवून ठेवली आहे. याचा विविध विषयाच्या अनुषंगाने विचार करून महत्त्वाच्या 37 विषयांचा या पुस्तकात समावेश केला आहे. श्री. बाळासाहेब पतंगे यांनी हे उत्तम पुस्तक लिहिले आहे.