कॅपॅबिलिटी-द फाउंडेशन ऑफ सक्सेस
आज लोक त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पोशाखाचे आणि जीवनशैलीचे अनुकरण करतात. मग त्यासाठी कितीही पैसा, वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवायला लागली तरी बेहत्तर! ते त्यांच्या बाह्य रूपाचे अनुकरण सहजपणे करतात पण जरा विचार करा, यशस्वी लोकांनी सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी प्रथम स्वतःला किती सक्षम बनवले?
वास्तविक प्रत्येक मनुष्य स्वतःमध्ये परिपूर्ण आहे, त्याच्यात गुणांचा खजिना दडलेला असून, तोही आपल्यातील क्षमता वाढवून यशाची शिखरं गाठू शकतो. माणसातील गुण हे खाणीत लपलेल्या कोळशासमान आहेत. त्यांना तापवून, घासून, पैलू पाडून हिर्याचा आकार दिला जाऊ शकतो. अशा हिर्यांना लुप्त द्वारातून बाहेर काढून त्यांच्यावर पैलू पाडण्यासाठी हे पुस्तक निश्चितच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात वाचा :
* जुन्या प्रोग्रामिंगमधून मुक्त कसे व्हाल?
* कार्यक्षमता वाढवण्याचे वैज्ञानिक कारण कोणते?
* स्वतःच्या नजरेत उत्तम ठरण्याची कला कशी शिकाल?
* घटनेचा सामना करण्याचा मंत्र कोणता?
* आपल्या ऊर्जेचा स्तर कसा वाढवाल?
* परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला कशी शिकाल?
* इच्छित फळ मिळविण्याचे रहस्य कोणते?
* 10,000 तासांच्या सरावाचे रहस्य काय?
लक्षात ठेवा, कॅपॅबिलिटी किंवा कार्यक्षमता ही अशी संपत्ती आहे, ज्याची कधीही चोरी होत नाही, उलट काळाबरोबर वाढतच जाते. म्हणूनच आधी सक्षम व्हा, मग यश मिळवा.